'सर्वोत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन' व तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ठ तांत्रिक कार्यक्षमता'' पुरस्कार

samarth1

पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट,पुणे या शिखर संशोधन संस्थेने कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुशनगर ता.अंबड जि.जालना या कारखान्यास सन 2016-17 करीता पाचव्यांदा 'सर्वोत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन' व तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ठ तांत्रिक कार्यक्षमता'' पुरस्कार प्रदान केला आहे.सदरील पुरस्कार पद्मविभूषण मा.खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब,अध्यक्ष वसंतदादा शुगर इन्स्टियुट,पुणे,मा.श्री.दिलीप वळसे पाटील,अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लि.,नवी दिल्ली तथा उपाध्यक्ष वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट पुणे,मा.आ.श्री.अजितदादा पवार,मा.आ.श्री.जयंत पाटील,हर्षवर्धन पाटील मा. आ. श्री. विजयसिंह मोहिते पाटील इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचे पारितोषिक कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती शारदाताई टोपे यांच्यासह मी स्वता: स्विकारले. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, संचालक श्रीरंगराव पैठणे, अमरसिंह खरात, मनोज मरकड, सरदारसिंग पवार, सुरेशराव औटे, फत्तेयाबखॉ पठाण, पाराजी सुळे, नरसिंगराव मुंढे, अशोक आघाव, त्र्यंबकराव बुलबुले, बाबासाहेब कोल्हे, किरण तारख, कैलास जिगे, तात्यासाहेब उढाण,सुधाकरराव खरात, दत्तु जाधव, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बी. टी. पावसे, चीफ अकौन्टंट श्री. आर. डी. पगार, वर्क्स मॅनेजर श्री. एस. एन. सुरवसे, जनसंपर्क अधिकारी श्री. सुधाकराव चिमणे इ. उपस्थित होते.

समर्थ कारखान्याच्या उल्लेखनिय कामगिरीची यानिमित्ताने दखल घेतली गेली आहे. समर्थ कारखान्याने आर्थिक बाबीत केलेली काटसर आणि सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या कल्याणकारी योजना व अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही कारखान्याने ऊस गाळप करुन तांत्रिक कार्यक्षमतेचा केलेला वापर यामुळेच वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट,पुणे या शिखर संशोधन संस्थेने आपले कारखान्याची या पारितोषीकासाठी निवड केली आहे ही बाब कारखान्याचे संचालक मंडळाने केलेल्या भरीव कार्याची पावतीच आहे या यशामुळे राज्यात कारखान्याचे नावलौकीक झाले.